Skip to main content

Posts

ऑफर?? नको रे बाबा!!!

ऑफर?? नको रे बाबा!!! - सुबोध अनंत मेस्त्री ================================== ================================== नमस्कार, गेले बरेच दिवस व्हाट्सअप्प वर एक मेसेज फिरतोय, अमेझॉनची ऑफर चालू आहे *सॅमसंग गॅलॅक्सी नोट 5* मोबाईल फक्त *999* रुपयात. गेल्या काही दिवसात रोज एका तरी ग्रुप वर किंवा पर्सनली असा मेसेज मला येतोच आहे. कधी तो मोबाईल ऑफरचा असतो किंवा टीव्ही ऑफरचा मेसेज असतो. पण बऱ्याच अंशी मेसेजचा फॉरमॅट सेमच असतो आणि याला बरेच जण सारखे बळी पडतात म्हणून हे आर्टिकल लिहिण्याचा विचार मला पोलीस इन्स्पेक्टर संजय गोविलकर दादा यांनी बोलून दाखवला आणि म्हणूनच हा लेख तुमच्यासाठी. ================================== ================================== = "Incoming Call Dada" असा मोबाईल स्क्रीन वर डिस्प्ले दाखवत आणि वादळवाट ची रिंगटोन वाजवत माझं लक्ष माझ्या मोबाईलने खेचून घेतलं. दादा म्हणजे इन्स्पेक्टर संजय गोविलकर. फोन उचलल्या उचलल्या मला दादांनी पहिला प्रश्न केला, "सुबु, अमेझॉन ऑफरचा मेसेज बरेच दिवस मला सारखा येतोय. ते खरं आहे का?? मी आतापर्यंत दुर्लक्ष ...
ही दोस्ती तुटायची नाय !!! - सुबोध अनंत मेस्त्री ===================================================== आज माझ्या मित्राचा वाढदिवस. हे पत्र खर तर मी त्याला पर्सनली पाठवायला हव होत पण मैत्री काय असते याच जीवंत उदाहरण हा माझा मित्र अजय आहे. या माझ्या पत्रातून मैत्री म्हणून एखाद्याच्या आयुष्यात आपला सहभाग कसा असावा व अजय व्यक्ति म्हणून कसा आहे हे जगापर्यंत पोहचाव म्हणून मी फेसबुक ल पोस्ट करत आहे. या पत्रातून अजय मुळे मी पुढे कसा येत गेलो हे मांडण्याचा हा प्रयत्न. ==================================================== प्रिय अजा, खर तर पत्र वैगेरे ही निव्वळ फॉर्मलिटी आहे आणि आपल्यात ती कधीच नसते. पण माणूस जगात नसेल तेव्हा त्याच लिखाण मागे राहत आणि भावना तोंडापेक्षा लिखाणातून चांगल्या बाहेर येतात म्हणूनच आज हे पत्र लिहितोय आणि असही आपण तोंडावर बोलताना शिव्यांशिवाय बोलत नाही. स्तुती तर खूपच लांब राहिली. आज थोडसं फॉर्मल बोलेन कारण आज इथे हे गरजेचं आहे. आयुष्यातल्या काही आठवणींची उजळणी करताना अख्खं आयुष्य डोळ्यासमोरून तरळून जातं. काही माणसं आयुष्यात येऊन निघून जातात. त्यांचा रोल आ...

आयत्या बिळात नागोबा!!!

=======================================================================  हा छोटासा लेख मला आलेल्या बँक फ्रॉड कॉल्सपैकी एक अनुभव आहे.  नक्की वाचा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. =======================================================================  कालच मला एका अनोळखी नंबरवरून कॉल आला आणि समोरची व्यक्ती ती बँकेतून बोलत आहे अशी मला भासवत होती.  माझा आधार कार्ड बँकेला लिंक नसल्याने माझं  ATM कार्ड ब्लॉक झालं आहे असे थातूर मातूर कारण सांगून त्या व्यक्तीने माझ्याकडून बँकेच्या कार्ड आणि पिन बद्दल माहिती काढण्याचा प्रयत्न केला.  मीही मला काहीच समजत नाही आणि कार्ड ब्लॉक झाल्यामुळे घाबरलो आहे असं दाखवून त्याला सगळी खोटी माहिती दिली.  नंतर त्याने बँकेची माहिती अपडेट होण्यासाठी तुम्हाला तासभर मोबाईल बंद ठेवावा लागेल असं सांगून फोन ठेवून दिला.  माझी ती खोटी माहिती वापरताना चूकीची आहे समजल्यावर त्याने मला शिव्या जरूर घातल्या असतील पण हे सामान्य माणसाला कसे फसवतात व काय सांगतात हे मला जाणून घ्यायचे होते.  ही केस तुमच्याबरोबर सुद्धा होऊ शकत...

रफ अँड टफ

आज ट्रेन मधून बेलापूरपासून चेंबूर पर्यंत प्रवास करत होतो. दर गुरुवारी मंदिरात जाण्याची सवय खूप पूर्वीपासूनच आहे आणि तेही चेंबूरचच साईबाबा मंदिर. तसा मी नेहमी संध्याकाळीच जातो पण रक्षाबंधन असल्याने संध्याकाळी जायला जमणार नाही म्हणून दुपारीच निघालो. दुपारची वेळ आणि त्यात काही लोकांची सुट्टी त्यामुळे ट्रेनला एवढी गर्दी नव्हती. पण काही लग्न झालेल्या आणि काही कुमारी अशा बहिणी नटून आपल्या भावाकडे निघाल्या होत्या आणि त्यांचं कुटुंब सोबत असल्याने काय ती थोडी फार रोजपेक्षा जास्त गर्दी. दरवाज्याच्या बाजूला सीटला समांतर असणाऱ्या जाळीच्या बोर्डला टेकून मी उभा राहिलो होतो आणि आठ दहा माणसे त्या पॅसेज मध्ये उभी होती. सीवुड स्टेशन ला ट्रेन थांबली आणि एक 12-13 वर्षाची मुलगी व तिच्याबरोबर दीड दोन वर्षाची लहान मुलगी ट्रेनमध्ये चढले. मोठी मुलगी काटकुळी...सावळी... केस सोडलेले आणि विस्कटलेले...चेहरा पूर्ण मळकटलेला...मळकट पंजाबी जांभळ्या रंगाचा ड्रेस तोही काळ्या रंगाच्या जवळपास गेलेला. एकंदरीत तिचा अवतार बघून एखाद्याला दया यावी, त्यापेक्षा ही अधिक कीळसच यावी आणि तिने आपल्याला हात लावून आपले...
नमस्कार...मी सुबोध अनंत मेस्त्री...तुमच्यासारखाच एक साधा सरळ माणूस....आज हा ब्लॉग सुरू करत आहे...आयुष्यात घडणार्‍या सध्या सरळ घटनामधून आपण खूप काही शिकत असतो...अशाच माझ्या आयुष्यात घडलेल्या या काही घटना...यातून कुणाला काही शिकायला मिळेल एवढीच अपेक्षा....मी कुणी लेखक नाही किवा साहित्यिक नाही...त्यामुळे माझी लेखणी सहज आणि सरळ आहे आणि त्यामुळे ब्लॉगच नाव सुद्धा तेच...या ब्लॉगला खूप सारे फॉलोवर्स मिळावेत अशी अपेक्षा नाही पण कुणाच्या तरी आयुष्यात काहीतरी छोट योगदान होईल एवढं नक्की....काही क्षण डोक्यात तात्पुरते राहतात आणि लिहून ठेवले तर ते कायम कोरले जातात...पुढे जाऊन हा ब्लॉग मी स्वता वाचेन तेव्हा माझ्याच आयुष्यातल्या ठळक आठवणी माझ्या नजरेसमोर उभ्या राहतील आणि त्यातली शिकवण सुद्धा :) #sahajsaral

जगून घ्या

माझा हा लेख त्या मित्रांसाठी आहे जे आज धावण्याच्या गडबडीत जगणं विसरले आहेत. आवर्जून वाचा. =================================== 2 दिवसापूर्वीच एक विचित्र घटना कानावर पडली आणि मन सुन्न झालं. दादाचा खास मित्र विजय याचा अपघाती मृत्यू झाला. त्याची बायको हि त्याची शाळेपासूनची प्रेयसी म्हणजेच 20 अधिक वर्षाची दोघांची ओळख आणि लग्नानंतर यांना एक पाच वर्षाची मुलगी त्रिशा. दादा मला त्याच्याबद्दल बऱ्याच गोष्टी सांगत होता. दादा आणि विजयने सोसायटीमध्ये एकत्र बरेच सण एकत्र साजरे केले होते आणि त्यामुळे त्यांची यारी जबरदस्त जमली होती. प्रत्येक पार्टीची जान होता विजय. दादाने त्याला कधी नाराज पहिलाच नव्हता. तो फक्त नाराज असायचा त्याची मुलगी आजारी असताना. त्याचा त्रिशा वर खूप जीव आणि तिलाही सारखा बाबाच लागायचा. त्रिशा आजारी असताना तो दादाला नाराजीने सांगायचा, "त्रिशा आजारी आहे रे. ती जेवत नसेल ना तर मलाही जेवण जात नाही. हि लहान पोर खेळता खेळता शांत झाली कि कशात मन लागत नाही.". गटारी एन्जॉय करायची म्हणून विजयच्या सगळ्या मित्रांनी रेसॉर्ट वर पिकनिक प्लॅन केला. पिकनिकला निघताना तो आईची ...

लॉलिपॉप

"मी बिजनेस चालू करायचा विचार करतोय. आम्ही पाचजण तयार झालोय. सगळे शाळेतलेच मित्र. तू ओळखतोस सगळ्यांना. शाळेपासून आतापर्यंत काही ना काही निमित्ताने एकत्र भेटतोच आम्ही पण आता या निमित्ताने आयुष्यातला बराच वेळ एकत्र काढता येईल. आम्ही रायगडावर गेलो होतो तिथेच ठरवल आम्ही. कंपनीच नाव पण ठरलंय. स्वराज्य.", मी एकदम उत्साहात दादाला सांगत होतो आणि तोही तितक्याच उत्साहात मला प्रतिसाद देत होता. "अरे वा! मस्तच नाव ठरवलंय तुम्ही. महाराजांचा आदर्श समोर असेल तर काही चुकीच घडणार नाही आपल्या हातून. बिनधास्त कर. पैशांची गरज लागणार आहे का तुला?". दादाने विचारल्यावर मी नकारार्थी मान डोलावली. नंतर माझे स्वप्न आणि प्लॅन दादाला सांगण्यात बराच वेळ गेला आणि तोही ते ऐकत होता. प्रतिसाद देत होता. मला त्यावेळी 3 वर्षाचा सॉफ्टवेअर इंडस्ट्री मधला अनुभव होता आणि कुणाच्या हाताखाली काम करण्याचा कंटाळा आल्याने स्वतःच स्वराज्य निर्माण करू अशी संकल्पना मी माझ्या मित्रांसमोर आमच्या रायगड ट्रिप मध्ये मांडली होती आणि माझ्या 4 मित्रांनी त्याला प्रतिसाद दिला. आयुष्यातली कोणतीही गोष्ट ठरवली की मी ती अग...