Skip to main content

रणझुंजार

  


रणझुंजार

स्वराज्य स्थापनेची शपथ घेऊन एखाद्या ठीपक्या एवढं साम्राज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी हजारो पटींनी त्यांच्या हयातीत वाढवलं. त्यावेळी एवढ्या बलाढ्य शाह्या फोफावलेल्या असताना स्वराज्य स्थापनेचा विचार करण हे सुद्धा धाडसाचं होत. या कार्यात त्यांना कित्येक गोष्टींचा त्याग करावा लागला. कितीतरी धाडसी प्रसंगाना समोर जावं लागलं. स्वतःची दुःख बाजूला सारावी लागली. अफजलखानच संकट स्वराज्यावर घोंगावत असताना त्यांच्या पहिल्या पत्नी सईबाई आपल्या लहान संभाजी राजांना जिजाऊंकडे सोपाऊन हे जग सोडून निघून गेल्या. त्यानंतर संभाजी महाराजांच्या आयुष्यात फक्त संघर्षच लिहिला होता.

पुत्रप्रेमाने आंधळ्या झालेल्या सोयराबाईनी सत्तेच्या हव्यासापोटी संभाजी महाराजांना संपवण्याचा प्रयत्न केला. मोगल, इंग्रज, पोर्तुगीज, हबशी यांच्यासोबत लढता लढता त्यांच्यावर स्वकियांशीसुद्धा लढण्याची वेळ येऊन ठेपली. त्यांच्या कारकिर्दीची ९ वर्ष त्यांना फक्त लढतच राहावं लागलं. त्यांनी कोणत्याही परिस्थिती हार मानली नाही आणि निकराने लढा दिला. या गोष्टीचा स्वतः औरंगजेबाला इतका त्रास झाला कि तो भलेमोठे सैन्य घेऊन स्वतः संभाजी महाराजांना संपवण्यासाठी दक्षिणेत उतरला. त्यातही महाराजांनी मोगलांना निकराचा लढा दिला व शेवटी महाराजांचे मेहुणे गणोजी शिर्के यांनी संभाजी महाराजांच्या संगमेश्वरातील वास्तव्याबद्दल औरंगजेबाचा सरदार मुकर्रब खान याला माहिती दिली आणि संभाजी महाराज बेसावध असताना पकडले गेले. औरंगजेबाने त्यांना मरणयातना दिल्या पण त्यातही महाराज झुकले नाहीत. वयाच्या ३२ व्या वर्षी त्यांना हौतात्म्य पत्कराव लागलं. स्वराज्य संपलं असं औरंगजेबाला वाटत असताना त्याला पुढे कित्येक वर्ष लढा द्यावा लागला आणि शेवटी याच मातीत त्याला मरावं लागलं.

छावा पुस्तकात छत्रपती संभाजी महाराजांच्या संपूर्ण आयुष्यावर प्रकाश टाकलेला आहे तर रणझुंजार या कादंबरीत महाराज्यांच्या विविध लढायांबद्दल विस्तृत माहिती दिली आहे. संघर्षमय आयुष्य काय असतं याचा प्रत्यय छत्रपती संभाजी महाराजांची कोणतीही कादंबरी वाचल्यावर येतो.

- सुबोध अनंत मेस्त्री


Comments

Popular posts from this blog

ऑफर?? नको रे बाबा!!!

ऑफर?? नको रे बाबा!!! - सुबोध अनंत मेस्त्री ================================== ================================== नमस्कार, गेले बरेच दिवस व्हाट्सअप्प वर एक मेसेज फिरतोय, अमेझॉनची ऑफर चालू आहे *सॅमसंग गॅलॅक्सी नोट 5* मोबाईल फक्त *999* रुपयात. गेल्या काही दिवसात रोज एका तरी ग्रुप वर किंवा पर्सनली असा मेसेज मला येतोच आहे. कधी तो मोबाईल ऑफरचा असतो किंवा टीव्ही ऑफरचा मेसेज असतो. पण बऱ्याच अंशी मेसेजचा फॉरमॅट सेमच असतो आणि याला बरेच जण सारखे बळी पडतात म्हणून हे आर्टिकल लिहिण्याचा विचार मला पोलीस इन्स्पेक्टर संजय गोविलकर दादा यांनी बोलून दाखवला आणि म्हणूनच हा लेख तुमच्यासाठी. ================================== ================================== = "Incoming Call Dada" असा मोबाईल स्क्रीन वर डिस्प्ले दाखवत आणि वादळवाट ची रिंगटोन वाजवत माझं लक्ष माझ्या मोबाईलने खेचून घेतलं. दादा म्हणजे इन्स्पेक्टर संजय गोविलकर. फोन उचलल्या उचलल्या मला दादांनी पहिला प्रश्न केला, "सुबु, अमेझॉन ऑफरचा मेसेज बरेच दिवस मला सारखा येतोय. ते खरं आहे का?? मी आतापर्यंत दुर्लक्ष ...

पत्त्यांचं घर

"पप्पा, पत्त्यांच घर बनवता येत?", सार्थकने महिन्याभरापूर्वी विचारलेला प्रश्न.  मे महिना संपत आला होता.  शाळेला सुट्टी आणि बिल्डिंगमधल्या मुलांशी कट्टी म्हणून अख्खा दिवस घरी.  अशा वेळी करायच काय हा प्रश्न त्याच्यासमोर नेहमीचाच.  बॉल ने खेळायला लागला तर घरातलं काहीतरी फोडेल याची भीती म्हणून ते ही आई बाबा घरात खेळून देत नव्हते.  कार फिरवायचा त्यालाच कंटाळा.  मग अशा वेळी सोपा उपाय म्हणून पत्त्यांच घर हा पर्याय बाबांनी सुचवला. "हो येत ना", अस सांगून एक छोट सॅम्पल त्याला बनवून दाखवलं.  तो खुश झाला. मध्ये एकदा चार माळ्याचं घर त्याने बनवलं होतं आणि त्याने आनंदात मला ते दाखवलं.  विशेष म्हणजे पत्त्यांच्या घराला भिंतीचा सपोर्ट नव्हता.  मला दाखवताना तो खूप एक्ससाईटेड होता.  मी त्याला शाबासकी दिली. "अरे भिंतीचा सपोर्ट घेऊन बांधलस तर अजून मोठं होईल", त्याला सांगितलं. "आता किती माळ्याचं बांधू?", त्याने आत्मविश्वासाने प्रश्न विचारला. "सात माळ्याचं", मी टारगेट दिलं. "पप्पा? सात माळे? पॉसीबल आहे का?", तो त्याच्या नेहमीच्या स्...

दहा रुपये

“पप्पा, तुम्ही एकदा शाळेत या ना.  तो एक मुलगा माझ्याकडे दहा रुपये मागतो रोज.", सार्थक शाळेत निघताना हेल काढून त्याच्या स्टाईलमध्ये अर्धा रडत आणि अर्धा बोलत मला सांगत होता. "कोण? तुझ्या वर्गातला आहे का ?", मी त्याला जवळ घेऊन विचारलं. "नाही.  चौथीतला आहे.  ती दोन मुलं येऊन माझ्याकडे दहा रुपये मागतात सारखी.  आणि नाही दिले तर मारेन म्हणतात", त्याचा तोच सूर होता. "तू घेतलेस का त्यांच्याकडून?", मी विचारलं "नाही" "मग का मागतायत ते?  बाईंना नाव सांगितलंस?", मी विचारलं. "बाईंना सांगितलं.  पण बाई म्हणतात तुमच्या आपापसातल्या कंप्लेंट माझ्याकडे आणायच्या नाहीत.", त्याचा सूर काही बदलत नव्हता. "जल्ल मेल्याचं तोंड ते.  कशाला बारक्या पोराला त्रास देतात? परवा पण सांगत होता तो मला.  कोण ती पोर बघ जरा जाऊन एकदा", आईमधला वकील जागा झाला.  मी लक्ष दिलं नाही. "तू खरंच नाही घेतले पैसे?", मी विचारल. "नाही पप्पा.  खरंच नाही", त्याने रेटून सांगितलं. "बाई ऐकत नसतील तर प्रिन्सिपल बाईंकडे जा.  ...