Skip to main content

Posts

संदेश दादाचे पत्र - ०९ जून २०१८

डिअर सुबु, ६जूनला पुष्पाने मेसेज केला कि, उद्या सुबोधदादाचा वाढदिवस आहे का? मी म्हणालो असेल कारण, मलाही नक्की तारीख माहित नव्हती, पण तेव्हा वाटलं काही लिहावं तुझ्याबद्दल... पण नाहीच जमलं, आणि आज विनूची पोस्ट येईपर्यंत हि खंतही होतीच, कायतरी लिहायला हवं होतं, एकुलता एक असल्याने भांवडांचं असणं नसणं जाणवतं नव्हतं पण जेव्हा जाणवलं, तेव्हा बहिणीची कमतरता जाणवली, पण ती जाणिव होतेय एवढ्यात खुप बहिणी मिळाल्या, मित्रांमुळे भाऊ असण्याची कमतरता वाटलीच नाही. आणि इतर मित्रांची भावाभावाची नाती पाहता, भाऊ नाही हे बरचं आहे, असंच वाटतं, अपवाद तुझा आणि रविचा, तुमचं तुमच्या भावांजवळचं नातं पाहता, असे छोटे भाऊ असावेत असं वाटायचं आणि ते वाटता वाटता तुम्ही दोघेही माझेच भाऊ कधी झालात, मलाच कळालं नाही, तुम्ही दोघेही देत असलेला मोठ्या भावाचा मान पाहून माझा मलाच हेवा वाटायला लागतो, तु तसा रविपेक्षा उशिराने आयुष्यात आलास, ... एक बरं असतं, घरातल्याच माणसांने काही लिहलं कि काही गोष्टी नव्याने कळतात, म्हणजे जसं सकाळी विनूनं लिहलयं तसं, तुझं अभ्यासात हुशार असणं, घरी लाडं होणं. हे नव्हतं मला माहित, आणि ए...

आभार - ०९ जून २०१८

*!!! आभार !!!* ९ जून १९८५.  मध्यरात्री २ च्या सुमारास शताब्दी हॉस्पिटल चेंबूर इथे माझा जन्म झाला. शौच नलिकेत त्रास असल्याने माझं ऑपरेशन करणं गरजेचं होतं.  पण ऑपरेशन नंतर बाळाला ठेवण्यासाठी जी काचेची पेटी लागते ती शताब्दी हॉस्पिटलमध्ये नव्हती.  त्यामुळे ताबडतोब के.ई.एम हॉस्पिटलला हलवाव लागेल नाहीतर जीवाला धोका आहे असा ईशारा डॉक्टरने दिला. आमचे शेजारचे खोत भाई त्यावेळी शताब्दीमध्ये कामाला असल्याने त्यांच्या ओळखीवर लगेच अँबुलन्स मिळाली व मला ताबडतोब के. इ. एम ला हलवलं.  तिकडे उपचार करून पुढचे ९ दिवस मी काचेच्या पेटीतच होतो.  माझ्यासोबत अजून अशी पाच सहा मुलं तशाच पेटीत होती आणि त्यातला मी बचावलो अस आई सांगते.  देवाने नक्कीच काहीतरी घडवून आणण्यासाठी मला मागे ठेवला असं मला कायम वाटत राहीलं.  पण नेमकं ते काय हे अजून गवसायचं बाकी आहे. त्यावर्षी तुफान पाऊस होता.  बेडची व्यवस्था नसल्याने बाळंतपणातच आईला जमिनीवरच चादर टाकून झोपावं लागायचं.  त्यात अधूनमधून सारखी ती उठून त्या पेटीजवळ जाऊन मला बघत राहायची.  तिच्या किती प्रार्थना देवाकडे गेल्या अस...

दहा रुपये

“पप्पा, तुम्ही एकदा शाळेत या ना.  तो एक मुलगा माझ्याकडे दहा रुपये मागतो रोज.", सार्थक शाळेत निघताना हेल काढून त्याच्या स्टाईलमध्ये अर्धा रडत आणि अर्धा बोलत मला सांगत होता. "कोण? तुझ्या वर्गातला आहे का ?", मी त्याला जवळ घेऊन विचारलं. "नाही.  चौथीतला आहे.  ती दोन मुलं येऊन माझ्याकडे दहा रुपये मागतात सारखी.  आणि नाही दिले तर मारेन म्हणतात", त्याचा तोच सूर होता. "तू घेतलेस का त्यांच्याकडून?", मी विचारलं "नाही" "मग का मागतायत ते?  बाईंना नाव सांगितलंस?", मी विचारलं. "बाईंना सांगितलं.  पण बाई म्हणतात तुमच्या आपापसातल्या कंप्लेंट माझ्याकडे आणायच्या नाहीत.", त्याचा सूर काही बदलत नव्हता. "जल्ल मेल्याचं तोंड ते.  कशाला बारक्या पोराला त्रास देतात? परवा पण सांगत होता तो मला.  कोण ती पोर बघ जरा जाऊन एकदा", आईमधला वकील जागा झाला.  मी लक्ष दिलं नाही. "तू खरंच नाही घेतले पैसे?", मी विचारल. "नाही पप्पा.  खरंच नाही", त्याने रेटून सांगितलं. "बाई ऐकत नसतील तर प्रिन्सिपल बाईंकडे जा.  ...

खाकीमागचा माणूस

======================================== परवा सहज माझ्या रुपेश नावाच्या मित्राबरोबर चर्चा करताना पोलीसांचा विषय निघाला.  त्याच्या कारमधला ऑडिओ सिस्टम चोरीला गेल्यानंतर त्याला ठाण्यातल्या वर्तक नगर पोलीस स्टेशनमधील "श्री. ज्ञानेश्वर आव्हाड" नावाच्या पोलीस अधिकारी साहेबांनी कशी मदत केली हे तो सांगत होता.  त्यावेळी बेदरे सरांची आठवण आली.  बेदरेसर हे माझ्या आयुष्यातले पहिले पोलीस ऑफिसर ज्यांच्याशी मी समोरासमोर भेटलो आणि बोललो.  त्याअगोदर पोलिसांबद्दल माझं मत काही खास चांगलं नव्हतं.  त्यानंतर एखाद वर्षांनी संजय गोविलकर दादा भेटले आणि खाकीमागच्या खऱ्या प्रेमळ माणसांची भेट झाली. ======================================== दहा वर्षांपूर्वीची गोष्ट.  मी जॉबला लागल्यानंतर मामाचा मुलगा श्याम पहिल्यांदाच मुंबईमध्ये आला होता.  घरात पार्टी व्हावी म्हणून पावभाजी घेण्यासाठी आम्ही बाईकवर दोघेही चेंबूरला सदगुरू रेस्टोरंटमध्ये गेलो होतो.  सदगुरुची पावभाजी खूपच फेमस आहे.  चेंबूरला पार्किंगचा नेहमीचाच इश्यू.  त्यात सदगुरु एकदम स्टेशनबाहेरच ना...

आनंदवन प्रयोगवन

व्यक्तीला त्याच्या आयुष्याचा हेतू एकदा सापडला कि तो पूर्णत्वास नेण्यासाठी ती व्यक्ती काय करू शकते याच उदाहरण म्हणजे "कै. बाबा आमटे". श्रीमंतीत वाढलेल्या आणि नंतर वकीली पेशात असणाऱ्या बाबांना एका पावसाळ्यात गटारात पडलेला कृष्ठरोगी दिसला ज्याच्या जखमांमधून अळ्या बाहेर येत होत्या.  पूर्ण शरीर उध्वस्त झालेल्या त्या व्यक्तीला पाहून आपण वकीली सोडून कृष्ठरोग्यांसाठी काहीतरी करावं हे त्यांनी निश्चित केलं आणि एका ऐतिहासिक प्रवासाची सुरुवात झाली.  1949 मध्ये समाजाने नाकारलेल्या काही क्रुष्ठरोग्यांना एकत्र घेऊन वरोऱ्यात सरकारकडून मिळालेल्या एका जंगलातून त्यांनी आनंदवनाला सुरुवात केली.  याच असहाय्य रोग्यांच्या मदतीने तिथे एक मोठं गाव उभं राहिलं.  स्वतःला लागणाऱ्या गोष्टी स्वतः निर्माण केल्या जाव्यात म्हणून शेती, डेअरी, निरनिराळे उद्योग असं भलं मोठं साम्राज्य उभं राहिलं.  कृष्ठरोग्यांबरोबरच अंध, अपंग आणि समाजाने दुर्लक्षिलेले असे कित्येक लोक आनंदवनाचा आसरा घेऊ लागले.  विदर्भ असल्याने पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी तळी खोदली गेली, विहिरी खोदल्या गेल्या.  कोणत्य...

दोंत वरी

"आपल्याला आज घरीच थांबावं लागेल.  आज जर बाहेर पडलो तर पुढची पूर्ण पिकनिकची वाट लागेल", एकंदरीत प्रतिभाची अवस्था पाहून मी तिला सांगितलं.  तीसुद्धा काही ऑब्जेक्शन घेणार नव्हती कारण तिलाही फिरण्याची ताकद नव्हतीच.  तापामुळे तिचा अवतारच झाला होता. आमचं मुंबईतून निघाल्यापासून जवळपास तीसेक तास फिरणच चालू होतं.  त्यात सलग तीन फ्लाईट्स, एअरपोर्टवर जे स्नॅक्स आयटम मिळतील ते खाणं आणि मलेशियामध्ये आल्यानंतर आम्ही बुक केलेला बंगला (व्हीला) लंगकावीच्या एकदम वेगळ्या टोकाला असल्यामुळे आम्ही दिवसभर फिरून नंतर तिकडे जाण्याचा घेतलेला डिसीजन या सगळ्यामध्ये सगळ्यांची दमछाक झाली होतीच.  पण प्रतिभाच्या शरीराला ही धावपळ आणि ते जेवण मानवलं नाही.  रात्री तापाची गोळी घेतली होती पण तिचा ताप काही उतरला नव्हता.  आज बोटीने प्रवास करण्याचा प्लॅन होता त्यात तिचा ताप अजूनच फोफावला असता याचा अंदाज होता म्हणून ईच्छा नसतानाही हे डिसीजन. बाहेर डायनींग टेबलवर सकाळी सगळ्यांना तो निर्णय सांगितला.  डॉक्टरकडे जाऊन येण्याचा सल्ला सगळ्यांनी दिला. मलाही तेच वाटत होतं.  आतापर्यंत य...

सिंगापूराण

फायनली आमचं फ्लाईट सिंगापूरमध्ये लँड झालं.  बरीच वर्षे चांगी एअरपोर्टबद्दल ऐकून होतो आता पाहायला मिळेल याची एकसाईटमेंट होती.  अपेक्षेप्रमाणेच चांगी अवाढव्य आणि एकदम प्लिजंट होत.  ठिकठिकाणी शोसाठी निरनिराळे रंगेबिरंगी आकार आणि त्यासमोर हमखास फोटो काढणारे कुणी ना कुणी फॉरनर हे चित्र जाता जाता सगळीकडे दिसलं.  इथले एस्केलेटर्स आपल्या  इकडच्या  मॉलमधल्या एस्केलेटर्सच्या कमीत कमी दुप्पट उंचीचे होते म्हणजे त्या फ्लोअर्स मधल्या उंचीचा अंदाज आला असेल.  आम्हाला इमिग्रेशन काउंटरला पोहचायला बराच वेळ लागला.  तशी लाईन बरीच होती पण काउंटरसुद्धा खूप सारे होते.  इथले ऑफिसर्स बऱ्यापैकी प्रोफेशनल वाटत होते आणि सगळ्यांचा काळ्या रंगाचा एकच युनिफॉर्म होता.  माझा नंबर आला तसा ऑफिसरने मला हसत वेलकम केलं.  "शुबथ मेस्त्री", त्याने माझा पासपोर्ट पाहून विचारलं.  "येस", मी म्हटलं. त्याने अर्ध्या नावाची काशी केलीच होती पण कमीत कमी आडनाव व्यवस्थित घेतलं होतं.  तरीही त्याच कौतुक वाटलं.  "दिस इज द फर्स्ट टाइम समवन हॅव प्रोनौऊन्स्ड मा...