आपल्या आयुष्यात लाईफ पार्टनरचा रोल महत्वाचा असतो आणि जर उद्योग असेल तर बिजनेस पार्टनरचा...आणि त्यात पार्टनरशी कनेक्शन स्ट्रॉंग असेल तर सोने पे सुहागा. चांगल्या माणसांच्या बाबतीत नशीब घेऊनच मी जन्म घेतला असल्यामुळे लहानपणापासूनच बरीच चांगली जीवाला जीव देणारी माणसं जोडली गेली...त्यातलाच एक...आमचा सॅंड्या. शाळेत एकत्र असल्यामुळे घरचेच संबंध. शाळेत लाजरा बुजरा, मोजकच बोलणारा. तसा शांत पण मस्तीखोर. त्याने वेगळे कोर्सेस घेतल्यामुळे कॉलेज वयामध्ये जास्त संबंध आला नाही पण तो नेहमीच घरी येऊन जाऊन असायचा. प्रत्येकाच्या फॅमिलीशी कनेक्ट स्ट्रॉंग. शाळेतले मित्र एकत्र भेटण्याच काही न काही निमित्त असायचंच त्यामुळे भेट होत राहायची. जेव्हा रायगडावर पहिल्यांदा बिजनेसचा विषय आला तेव्हा इतर तिघांबरोबर सॅंड्या तयार झाला आणि आमचं नातं मित्रापासून पार्टनर्समध्ये बदललं. इतक्या वर्षात बिजनेसच्या चढउतरांमध्ये मी बऱ्याच वेळा खचलो असेन पण तो कायम ठाम होता. प्रत्येक वेळी मला सांभाळून घेत, माझा फ्रीडम त्याने मला एन्जॉय करून दिला. मी जे नवीन काही करत होतो त्या प्रत्येक गोष्टीला प्रोत्साहन दिलं. स्...