तुम्हाला तुमचे कपडे इस्त्री करावे लागणार नाहीत किंवा मुळात तुमचे कपडे कधी खराबच होणार नाहीत. त्यावर कोणतेही डाग पडणार नाहीत. इस्त्री जर का फिरलीच तर तुमच्या कपड्यांचा रंग बदलण्यासाठी फिरेल. म्हणजे एकच शर्ट तुम्ही वेगवेगळ्या रंगामध्ये वापरू शकाल. नॅनोटेक्नॉलॉजी बद्दल अच्युत गोडबोलेजींच्या "नॅनोदय" पुस्तकात असं बरंच काही वाचलं होतं. त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आता मार्केटमध्ये येऊ घातल्या आहेत. जेव्हा एखाद्या सुपरफिशिअल सिनेमामध्ये पाहिलेल्या गोष्टी अशा पुस्तकात वाचायला मिळतात आणि ते खरं होऊ शकत हे पटवून देतात तेव्हा एक वेगळीच मजा असते. असं काहीतरी वेगळं वाचायला मिळेल या अनुषंगाने अजाने दिलेलं निळू दामले यांचं "टेक्नियम" हे पुस्तक वाचायला घेतलं. त्यात टेकनॉलॉजीचा तसा मागोवा सुरुवातीपासून दिसला नाही. अख्ख पुस्तक टीव्हीबद्दल च्या सर्वेवरच मांडलेलं होतं. म्हणायला तसा हिरमोड तर झाला नाही कारण हा प्रवास बघणार्यांपैकी मीसुद्धा एकच. पण हाच प्रवास भारतातील वेगवेगळ्या खेडेगावात ...