गेला दीडेक महिना फेसबुकवर युवोत्सव २०१८ ची जाहिरात चालू होती. गेली कित्येक वर्ष काही ना काही निमित्ताने आम्हाला सुतार समाजाचा कार्यक्रम अटेंड करता येत नव्हता. यावर्षी क्लासच्या वार्षिक स्नेहमेळाव्याला राकेश आवर्जून आला होता व निघताना त्यांनी तारीख आणि वेळ सांगून महिनाभर आधीच आमच्याकडून कमिटमेंट घेतली होती. सुशीलसुद्धा इव्हेंटमध्ये होताच त्याचा वेगळा फॉलोअप आणि त्यावर अजून संदेश फेसबुक मेसेंजरवर रिमाईंडर मेसेज टाकत होताच. "९० हुन अधिक कलाकार मिळून काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ते आपल्या जवळचे आहेत त्यामुळे वेळ काढून जाऊच", असं दादा आणि मी ठरवलं होतं. तरीसुद्धा एक कन्फर्मेशन म्हणून काल सकाळी राकेशने पुन्हा आठवण करून देण्यासाठी फोन केलाच. संध्याकाळी काम लवकर आवरून दादा आणि मी एकत्र परेलला पोहचलो. दामोदर हॉलला आठचा कार्यक्रम होता आणि सव्वाआठ होऊन गेले होते. काउंटरला तिकीट्स असतील असं राकेशने मला व्हाट्सपवर सांगितलं होतं पण आमच्या नावाची तिकीट्स नव्हती. तिकीट्स विकत घेतली आणि जर आधीच घेतली असतील तर ती फुकट जातील म्हणून दादा आणि मी कन्फ्युजन मध्ये होत...