Skip to main content

Posts

टारगेट नाईन्टी प्लस

- सुबोध अनंत मेस्त्री =========================================  नमस्कार.  ही घटना मी नुकत्याच केलेल्या एका कोर्सदारम्यानची आहे.  मुलांवर कोणत्याही गोष्टीची जबरदस्ती  करताना त्यांच्या मनावर आपण काय परिणाम करतोय याची काळजी पालकांनी घ्यायला हवी.  वरवर शांत दिसणारी मुलं मनात विचारांचं वादळ घेऊन फिरत असतात याच जिवंत उदाहरण देणार हे आर्टिकल. ========================================= मी नुकताच एक लाईफ ट्रान्सफॉर्र्मेशन चा कोर्स केला.  पहिल्याच दिवशी तुम्ही हा कोर्स का लावला याबद्दल ट्रेनर तिथल्या पार्टीसिपेंटना माहिती विचारत होता.  हॉलच्या डाव्या आणि उजव्या बाजूला दोन स्टँडिंग माईक लोकांना बोलण्यासाठी ठेवण्यात आले होते.  बरेच लोक माईकवर येऊन स्वतःबद्दलचे प्रॉब्लेम्स शेअर करत होते.  काही लोकांना तिकडे जबरदस्ती कुणी ना कुणी पाठवलंय हे सुद्धा त्यांनी सगळ्यांसमोर कबूल केलं.  त्यात एक 16-17 वर्षाचा मुलगा माईकवर बोलण्यासाठी रांगेत उभा राहिला होता.  चष्मा लावलेला, सावळा वर्ण, स्पाईक कट...थोडा स्टाइलीश पण तितकाच चेहऱ्यावरून स्कॉलर स...

ट्राय ट्राय

-सुबोध अनंत मेस्त्री ========================================================================== नमस्कार, बऱ्याच दिवसांनी लेख घेऊन आलो आहे. सहज सरळच्या माध्यमातून मी आजूबाजूच्या घटनांचा अभ्यास करत असतो. ही सुद्धा अशीच एक साधी सरळ घटना. लहान मुलांना त्यांचे पालक प्रत्येक गोष्टीत कमी लेखत असतात किंवा त्याला एखादी गोष्ट जमणार नाही हे त्याच्या मनावर बिंबवत असतात आणि त्याने त्या मुलाचा आत्मविश्वास खालावत जातो. अशा बऱ्याच घटना मी लहानपणापासून अनुभवत आलोय आणि ते माझ्या मुलाच्या बाबतीत होऊ द्यायचं नाही याची जमेल तितकी काळजी घेतो. मुलांना त्यांच्या चुकांची जाणीव अप्रत्यक्षपणे करून देणं व चांगल्या कामासाठी त्याची पाठ थोपटण हे पालकांचं कर्तव्य आहे. ============================================================== आज सकाळी नाश्त्याला ऑम्लेट खायचं म्हणून मी फ्रिजचा दरवाजा उघडला आणि अंड्यांचा कप्पा रिकामा? "आई...अंडी संपली का सगळी?", कालच 4-5 पहिली असल्याने मी जवळपास कुतूहलाने विचारलं.   "हो, तुझ्या पोरालाच लागतात सारखी.  सकाळ संध्याकाळ अंड्याची पोळी पाहिजे त्याला...

नेटयुग

नेटयुग -    सुबोध अनंत मेस्त्री सध्या नेटयुग जोरदार सुरु आहे. स्मार्टफोनमुळे संपूर्ण जग आपल्या हाताच्या बोटावर आलं आहे. “काय तू व्हाट्सअप/ फेसबुकवर नाहीस? कुठल्या जगात वावरतो राव!.” म्हणजे व्हाट्सअप किंवा फेसबुकवर नसणं म्हणजे जगाच्या कितीतरी मागे असल्याचा एक समज निर्माण झालाय. एखादा इव्हेंट किंवा पिकनिकच सोडाच पण आता लोक कोणत्या हॉटेल मध्ये जेवतायत, कोणतं गाणं ऐकतायत कोणता पिक्चर बघतायत हे सुद्धा पोस्ट करतात. या आभासी जगात व्यक्ती विशेषतः मुलं हरवत चालली आहेत. आता इंटरनेटसुद्धा दिवसेंदिवस स्वस्त होत जाईल. बऱ्याच ठिकाणी डिजिटल इंडियाच्या उपक्रमाखाली वायफाय कनेक्शन लावले जातील आणि या आभासी जगाच्या कक्षा आणखी रूंदावतील. सकाळी झोपतुन उठल्या उठल्या लगेच आपण पहिले व्हाट्सअप चे मेसेजेस चेक करतो आणि मग आपल्या पुढच्या कामाला सुरुवात होते. त्यानंतरही काम करत असताना काही मिनिटांनी आपलं लक्ष या मोबाईल कडे जातंच आणि आपण आपल्या कामापासून वेगळे होतो. सोशल मीडियाचा व्यवस्थित वापर झाला तर त्यासारखं प्रभावी माध्यम कोणतंच नाही. पण याचा गैरवापर होत असेल तर त्यासारखं घातकही काही ...

गिफ्ट

*गिफ्ट* - सुबोध अनंत मेस्त्री ====================================== माझा मुलगा सार्थक साडे पाच वर्षांचा आहे.  या वयात मुलांना चॉकलेट्स, कॅडबरी, आईस्क्रीम अशा गोष्टी आवडतात.  सध्या किंडर जॉयची क्रेझ मुलांना आहे.  त्यातलं चॉकलेट खाण्यापेक्षा खेळणी कोणती मिळतात यात त्यांना इंटरेस्ट जास्त असतो.   सार्थक सुद्धा किंडर जॉय पहिल्यांदा दोन वर्षांपूर्वी खाल्ल्यापासून दुसऱ्या चॉकलेट बद्दल बोलतच नाही.  आता एखाद्या चॉकलेटच्या तुलनेत ही किंमत कमीत कमी दुप्पट आहे.  त्याला पैशाची किंमत आतापासून कळावी म्हणून काहीतरी करावं अशी ईच्छा होती.  तेवढ्यात माझा फायनॅनशीअल ऍडवायजर मित्र महेश चव्हाण याची पोस्ट मी फेसबुकवर पाहिली.  त्याचा मुलगा स्पर्श सार्थकपेक्षा एक दोन वर्षे लहान आहे.  स्पर्शने त्याच्या गल्ल्यातल्या सेविंग मधून स्वतःसाठी सायकल घेतली अशी ती पोस्ट होती.  मला कल्पना सुचली.  सार्थकची जुनी वॉटरबॅग आम्ही गल्ला म्हणून वापरायला लागलो.  काम केल्याशिवाय पैसे मिळणार नाहीत हे समीकरण.  मग ते अंथरून घालणं असू दे किंवा कचरा काढणं असू दे. ...

डिसिजन

-सुबोध अनंत मेस्त्री ===================================================== ======= आपल्या आयुष्यात असे काही प्रसंग येतात ज्यात आपण पूर्णपणे हतबल होतो.  त्यावेळी ती परिस्थिती देवावर किंवा नशिबावर सोडण्याशिवाय आपल्याकडे पर्याय राहत नाही.  असाच एक प्रसंग माझ्या आयुष्यात घडला.  हा प्रसंग प्रत्यक्ष माझ्या घरातला नसेल तरी मनावर ठसा उमटवून जाणारा होता.  ज्या व्यक्तींनी हॉस्पिटल आणि विशेषतः आय. सी. यु. जवळून पहिला असेल त्यांना हा प्रसंग नक्कीच स्पर्शून जाईल ==================================================== ======= "सुबू, अरे मनीषाला ब्रेन हॅमरेजचा अटॅक आला आठ दिवसापूर्वी. आता आय सी यु मध्ये आहे. डॉक्टरने फक्त 24 तासाची मुदत दिली आहे. तू आणि विनू जाऊन भेटून ये एकदा.", पप्पा मला सांगत होते आणि मी एकदम स्तब्ध होऊन ऐकत होतो. मनीषा म्हणजे माझी मावशी. काकीची सख्खी बहीण. जेमतेम 35-40 वर्षांची. या वयात हे अस कस होऊ शकत हाच प्रश्न माझ्या डोक्यात सतत फिरत होता. तिच्याबरोबर घालवलेले सगळे क्षण डोळ्यासमोरून तरळून गेले. तसे आम्ही फार काळ एकत्र नव्हतो पण ज...

दादास पत्र

दादास पत्र - सुबोध अनंत मेस्त्री ===================================================== तस तर तुमच्यातले बरेच जण विनोदला पर्सनली ओळखता.  तो व्यक्ति म्हणून कसा आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे.  अस म्हणतात की देवाला प्रत्येक माणसावर लक्ष देता येणार नाही म्हणून त्याने आई बनवली.  माझ्यासाठी देव बर्‍याच व्यक्तिच्या रूपाने माझ्याबरोबर असतो आणि त्यातलाच माझा दादा आहे.  माझ्या आयुष्यात माझ्या भावाच जे योगदान आहे त्यामुळेच मी आज इथपर्यंत पोहोचलोय.   आभार ही खूप छोटी संकल्पना आहे त्यांच्यासाठी ज्यांनी तुमचं आयुष्य घडवलय पण या गोष्टी जगासमोर सुद्धा यायला हव्यात.  या पत्रातून मी काही जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न केला आहे. ==================================================== प्रिय दादू, वाढदिवस हा फक्त निमित्त आहे या सगळ्या गोष्टी कागदावर उतरवण्यासाठी. पण आज जी प्रत्येक गोष्ट मी मांडेन ती मी खूप वेळा आणि खूप लोकांसमोर बोललो आहे. हल्ली स्मरणशक्ती एवढी कमजोर झाली आहे की कालच कुणाला आठवत नाही. पण आठवणी कागदावर उतरल्या की त्या चिरतरुण राहतात. भाऊ नक्क...

ऑफर?? नको रे बाबा!!!

ऑफर?? नको रे बाबा!!! - सुबोध अनंत मेस्त्री ================================== ================================== नमस्कार, गेले बरेच दिवस व्हाट्सअप्प वर एक मेसेज फिरतोय, अमेझॉनची ऑफर चालू आहे *सॅमसंग गॅलॅक्सी नोट 5* मोबाईल फक्त *999* रुपयात. गेल्या काही दिवसात रोज एका तरी ग्रुप वर किंवा पर्सनली असा मेसेज मला येतोच आहे. कधी तो मोबाईल ऑफरचा असतो किंवा टीव्ही ऑफरचा मेसेज असतो. पण बऱ्याच अंशी मेसेजचा फॉरमॅट सेमच असतो आणि याला बरेच जण सारखे बळी पडतात म्हणून हे आर्टिकल लिहिण्याचा विचार मला पोलीस इन्स्पेक्टर संजय गोविलकर दादा यांनी बोलून दाखवला आणि म्हणूनच हा लेख तुमच्यासाठी. ================================== ================================== = "Incoming Call Dada" असा मोबाईल स्क्रीन वर डिस्प्ले दाखवत आणि वादळवाट ची रिंगटोन वाजवत माझं लक्ष माझ्या मोबाईलने खेचून घेतलं. दादा म्हणजे इन्स्पेक्टर संजय गोविलकर. फोन उचलल्या उचलल्या मला दादांनी पहिला प्रश्न केला, "सुबु, अमेझॉन ऑफरचा मेसेज बरेच दिवस मला सारखा येतोय. ते खरं आहे का?? मी आतापर्यंत दुर्लक्ष ...