बरेच वर्ष उद्योगात असल्याने किंवा मुळात बिजनेस नेटवर्किंगचा भाग असल्याने बऱ्याच लोकांशी भेट होते. त्यात काही मोठमोठ्या उद्योजकांची सुद्धा भेट होते. त्यांच्याशी चर्चा होते. बऱ्याच नव्या गोष्टी कळतात किंवा शिकायला मिळतात. पण काही व्यक्ती आपल्या आयुष्याला, मनाला स्पर्श करून जातात. क्वचित असं घडतं की एखाद्या व्यक्तीचं इम्प्रेशन २ दिवस - ३ दिवस सलग डोक्यात राहतं. माझं तसं झालं. शुक्रवारी "उद्योग गर्जना २०२५" कार्यक्रमाच्या निमित्ताने वामन हरी पेठे ज्वेलर्सचे पार्टनर श्री. आशिष पेठे सर यांच्यासोबत वेळ घालवण्याची संधी मिळाली, त्यांची मुलाखत घेण्याची संधी मिळाली आणि हे मी माझं भाग्य समजतो. यावर्षी महाराष्ट्र बिजनेस क्लब प्रस्तुत "उद्योग गर्जना २०२५" या कार्यक्रमात लक्ष्यवेध इन्स्टिट्यूट ऑफ लीडरशिप अँड एक्सिलन्स चे डायरेक्टर श्री. अतुल राजोळी यांच्या रेफेरन्सने आशिष पेठे सरांचा कॉन्टॅक्ट मिळाला. अरुण सिंह सर, मंगेश यादव सर, दिनेश भरणे सर आणि मी असे चौघे त्यांना निमंत्रण देण्यासाठी गेलो होतो....