कॉलेजमध्ये अनेक मित्रांचा ग्रुप आणि त्यामध्ये एक मैत्रीण असते. माझ्याही ग्रुपमध्ये होती. डिग्रीच्या फर्स्ट ईयरला आमची ओळख झाली. मी स्पर्धेसाठी एकांकिका बसवत होतो आणि तेव्हा कॉमर्स स्ट्रीम मधल्या एका कलाकाराने हीचं नाव सजेस्ट केलेलं. ती एकांकिका तर मस्तच झाली पण त्या निमित्ताने मला आयुष्याभरासाठी एक चांगली मैत्रीण भेटली. त्यानंतर कितीतरी परफॉर्मन्सेस आम्ही एकत्र केले. जेव्हा तिने नाटकात काम केलं नाही तेव्हा ती खंबीरपणे बॅकस्टेजला माझ्यासोबत उभी राहिली. समोर असताना कितीही टांग खेचली असेल पण तिच्या डोळ्यात कौतुक कायम असायचं. सेकंड ईयरला मी कल्चरल सेक्रेटरी आणि ही जॉईंट कल्चरल सेक्रेटरी होती. पण माझा अभ्यास आणि इतर एक्टिव्हिटीजमुळे वेळ मिळत नसताना हिने माझीही कामे विना तक्रार केली. तेव्हा आमची मैत्री अजून खुलली. मला कुणी हिरो घेणार नाही आणि तिला कुणी हिरोईन म्हणून प्रसादने लिहिलेली गाथा माझ्या प्रेमाची आम्ही लिड रोल मध्ये सगळ्या टीम सोबत केली होती. कॉलेजच्या ऍन्यूअलचा तो परफॉर्मन्स आयुष्यभर न विसरता येण्याजोगा आहे. मी माझी सिक्रेट्स तिच्यासमोर ओपन करायला लागलो आणि तिने ग...