“काकी तू आता रिटायरमेंट घेऊन पुस्तक लिहायला हवंस” अस कित्येक वेळा काकीशी बोलणं झालं असेल. तिची मुख्याध्यापिकेची नोकरी, तिथली जबाबदारी, तिची समाजसेवी कामे यातून तिला तशी फुरसत मिळणं कठीणच. त्यात २५-३० वर्षापूर्वी झालेलं तिचं फुफुसाचं मोठं ऑपरेशन. एवढ्या अवघड परिस्थितीतून नोकरीतल्या जबाबदाऱ्या आणि स्वतःची तब्येत सांभाळत लिखाण करणं थोडं अशक्यच होतं. पण तिचे विचार लोकांपर्यंत पोहचायला हवेत या अनुषंगाने आम्ही तिला विनंती करायचो. आणि शेवटी ते स्वप्न पूर्ण झालं. काही दिवसांपूर्वी कवितेचं पुस्तक करायचं अस काकीने बोलून दाखवलं आणि आम्ही कामाला लागलो. कोणत्या ना कोणत्या स्पर्धेच्या निमित्ताने काकीने प्रासंगिक कविता केल्या होत्या व त्यात तिला बक्षीसही मिळाली होती. सगळ्याच कविता अप्रतिम होत्या. कौतुक म्हणजे वीस एक वर्षापासूनच्या या सगळ्या कविता काकीने जपून ठेवल्या होत्या. प्रत्येक कवितेवर टाकलेल्या तारखेमुळे आम्हाला ते कळालं. पुस्तकावर काम करण्याचा उत्साह वेगळ्या लेव्हलचा होता कारण हे पुस्तक मॉरिशसला प्रकाशित होणार होतं. समीरच्या मिडाशियन टचने पुस्तकाच अप्रतिम डिजाईन झालं आणि अखेरी...