पुंडलिक आणि माझी ओळख जवळपास १४ वर्षांपूर्वीची. स्वतःचा व्यवसाय करताना सामाजिक बांधिलकीतून काहीतरी नवनवीन समाजासाठी करत रहावं हा त्याचा प्रयत्न असतो. बरेच वर्ष डोक्यात घोळत असलेल्या कल्पनेतून २०१६ साली माणुसकीची भिंत प्रत्यक्षात अवतरली. "जे नको असेल ते द्या, आणि जे पाहिजे ते घेऊन जा" या संकल्पनेतून कित्येक लोकांना त्यांच्या गरजेच्या वस्तू मिळाल्या. गरीब श्रीमंत असा भेदभाव न दाखवता "गरजवंत" व्यक्तींनी वस्तू घेण्यात पुढाकार दाखवला. पुंडलिक, महेश चव्हाण आणि त्यांचे सहकारी यांनी प्रचंड मेहनतीने पहिला प्रोजेक्ट यशस्वीरीत्या राबवला. त्यानंतर २०१८ साली आणि आता पुन्हा एकदा ती भिंत प्रत्यक्षात अवतरली. जर हेतू चांगला असेल तर लोअर परेल मुंबईसारख्या अत्यंत अडचणीच्या ठिकाणी सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणावर एखादा प्रोजेक्ट उभा राहू शकतो आणि तो यशस्वीरीत्या पार ही पडू शकतो हे पुंडलिक आणि त्याच्या टीमने दाखवून दिले. यापुढे हि त्यांच्या बऱ्याच योजना आहेत ज्या लवकरच या कन्सेप्टला धरून राबवल्या जातील. आपल्यातील प्रत्येकाने पेनिनसुला बिजनेस पार्कच्या में गेटजवळ असणाऱ्या माणुसकीच्या भिंत...