वर्क फ्रॉम होमचा कन्सेप्ट बाहेरच्या देशात नवीन नाही. इंटरनेट बुमनंतर बऱ्याच कंपन्यांनी विदेशात वर्क फ्रॉम होमची मुभा दिली. भारतात तीच गोष्ट कोव्हिडमध्ये जास्त प्रमाणात रुजली गेली. बऱ्यापैकी कंपन्यांना सक्तीचा वर्क फ्रॉम होम करावा लागला आणि तो जमलासुद्धा. एम्प्लॉयीचा महिन्याचा ऑफिसमध्ये होणारा खर्च, मोठ मोठ्या ऑफिसच्या मेंटेनन्सचा खर्च, लाईट, इंटरनेट, प्रवास आणि इतर बरेच खर्च यामध्ये कमी केले गेले. त्यामुळे बऱ्याच छोट्या मोठ्या कंपन्यासाठी वर्क फ्रॉम होम सवयीचा भाग झाला. शहरात काम करणाऱ्या एखाद्या व्यक्तीला ऑफिसमध्ये पोहचण्यासाठी १.५ तास लागत असेल (मुंबईच्या कामगारवर्गासाठी हा सरासरी वेळ आहे), तर येऊन जाऊन त्याला दिवसाचे ३ तास प्रवास करावा लागतो. शनिवार रविवार सुट्टी पकडून २२ दिवसांचा महिना पकडला तरीही ३ x २२ x १२ म्हणजेच ७९२ तास फक्त प्रवास होतो आणि २४ तासांचा दिवस या हिशोबाने ३३ दिवस वर्षातून फक्त प्रवासात जातात. त्यात प्रवासामुळे येणारा क्षीण वेगळाच. रिमोट वर्किंग म्हटल की आपल्या डोक्यात घरातून काम करणे एवढंच असतं. बऱ्याच घरांमध्ये ती शक्यता कमी. पण रिमोट वर्क म्हणजे एम...