"पप्पा, मी बनणार तर शिवाजी महाराजच बनणार. नाहीतर काहीच नाही", अर्ध्या झोपेत सकाळी अंथरुणातच सार्थक मला सांगत होता. "अरे बाळा, नाही मिळाला कॉश्च्युम महाराजांचा तुझ्या साईझचा. आता कसं करायचं मग? अरे हा बघ ना हा कन्सेप्ट मस्त आहे. ", माझ्या मोबाईल वर डाउनलोड केलेली इमेज त्याला मी दाखवली. त्यात मलमपट्टी केलेल्या एका मुलाचा फोटो होता आणि एक पाटी गळ्यात अडकवली होती, "आय अर्ग्युड विथ माय वाइफ". मी फक्त तो मॅटर चेंज करून मस्त एक कविता बनवली होती. "चालताना रस्त्यावर किंवा असाल जेव्हा गाडीवर बाजूला ठेवा मोबाईल आणि लक्ष ठेवा रस्त्यावर घरी वाट पाही कुणी जीव नसे हा स्वस्त मोबाईलच्या नादात हे आयुष्य होईल उध्वस्त" या वेषभूषेसाठी घरात फर्स्ट एडच सगळं सामान पण तयार होत. मी त्याला अंथरुणात त्याच्या बाजूला पडून फोटो दाखवता दाखवता ती कविता ऍक्टिंग करत ऐकून दाखवली. मला वाटलं तो कन्व्हिन्स होईल पण तसं झालं नाही. "तुम्ही बाईंना फोन करून सांगा सार्थक भाग घेत नाही. माझा ...