"चाचा अल्लाह से वैभव के लिये दुवा मांगो. वो पहले की तरह ठीक होना चाहिए", दर्ग्याच्या बाहेर बाकड्यावर बसलेल्या चाचांना मी विनंती केली. ते बहुतेक तिथले मुख्य असावेत. वैभवला दर्ग्यामध्ये जाण्यासाठी शूज काढावे लागतील आणि पुन्हा घालायला त्रास म्हणून तो बाहेर त्या चाचांशी गप्पा मारत उभा होता. "हमने तो मन्नत मांग रखी है. वैभव हमारे भावकी का है. हम उसको अलग नही मानते. दर्गा का पुरा काम ऊसिने किया है. कूच काम रहेगा तो हम सुभाष (वैभवचे बाबा) को नहीं. वैभव को फोन करते थे. बच्चे की किस्मत मे ये क्या आ गया. ठीक तो ऊसको होना ही है. उसके अलावा हमको भी नहीं जमता", चाचांनी थोडस भाऊक होऊन आम्हाला सांगितलं. फूणगुस हे आमच्या बाजूचं गाव. डिंगणी आणि फूणगुस मध्ये एक खाडी आहे आणि त्या दोन गावांना जोडणारा खाडीवरचा पुल. त्या पुलावर बरेच लोक संध्याकाळी फिरायला किंवा गळ टाकून मासे पकडायला येतात. वैभव हल्ली काही दिवस सुपरवायजर म्हणून फूणगुसमध्ये एका मुस्लिम फॅमिलीकडे काम पाहत होता. कोव्हिडच्या पह...