====================================================================== नमस्कार, आपल्या घरात लहान मुलं असतील तर त्यांना सहज खर्चाला पैसे देणे किंवा त्यांचे हट्ट पुरवणे हे अगदी कॉमन आहे. पण याचबरोबर ती मुलं हट्टी होणार नाहीत किंवा त्यांना पैशाची किंमत कळेल याची काळजी घेतली पाहिजे. लहान वयात मुलांना गुंतवणुकीच महत्व पटवून दिलं तर त्यांना पूर्ण आयुष्य सुखात जगण्यात काहीच त्रास होणार नाही हे नक्की. मी ते कसं करतोय या अनुभवावर माझा हा लेख. ===================================================================== "अरुण अंकल, आज मेरा बर्थडे था ना तो मेरा पिगी बँक ओपन किया है| टू थाउजंड फोर हंड्रेड फोरटी रुपीज निकला है| मै पप्पा के पास भेजता हु| आप मेरे अकाउंट मे डाल देना|", सार्थकने मी विसरेन या विश्वासाने डायरेक्ट अरुण सरांना फोन करून माझ्याकडून पैसे घेण्याची सूचना आधीच देऊन ठेवली. हे पैसे त्याच्या म्युच्युअल फ़ंड अकाउंट मध्ये फिरवायचे होते. खरं तर त्याचा अकाउंट उघडायला एक वर्ष लेटच झालं होतं. सातव्या वाढदिवसाला जेव्हा त्याने त्याचा गल्...