======================================================== नमस्कार, आयुष्यातलं सगळ्यात जास्त गृहीत धरलं जाणारं नातं म्हणजे आई-बाबा. आपण नकळत त्यांना दुखावून जातो पण त्यांच्या लेखी क्षमा हा शब्द कायमच आहे. "तुम्ही कधी म्हातारे नाय होणार काय रे भाडखाऊ?", हा नाना पाटेकरांचा "आपला माणूस" चित्रपटातला संवाद यावेळी आठवतो. आपण सगळं करत असताना खरंतर कुठेतरी कमी पडतो याची मला झालेली जाणीव म्हणजे हा लेख ========================================================= "या गोळ्या कुणी टाकल्या यात नवीन?", आईच्या मेडिसिन बॉक्समध्ये इव्हनिंग सेक्शनमध्ये गोळ्या पाहून मी विचारलं. तिला गोळ्या वेळच्यावेळी खायला समजत नाही म्हणून आठवडभराचं सकाळ दुपार संध्याकाळ असे स्लॉट्स असलेलं एक मेडिसिन किट बॉक्स मी दहा दिवसापूर्वी घेऊन आलो होतो. त्यात सगळ्या गोळ्या सकाळ आणि संध्याकाळच्या कापून ठेवल्या. आपण बोलताना ती दुसऱ्याच विचारात असते म्हणून तिला तीन वेळा समजावून सांगितलं. आज आठवडा संपला म्हणून आठवडभराच्या गोळ्या पुन्हा भरायच्या म्हणून पाहिलं तर आठवड्याभराचे एव्हीनिंग ...