*वि प्रेफर स्मार्ट लँग्वेज* - सुबोध अनंत मेस्त्री ========================================================== "एक्स्क्यूज मी....आर यु गाईस लोकल हिअर?", एक तिशी पस्तीशीतल्या तरुणाने आमच्या जवळ येऊन विचारलं. सामान्य मध्यमवर्गीय घरातला, गोल चेहरा, सावळा वर्ण, इन शर्ट आणि हातात नायलॉनची झिप असलेली बॅग. त्याच्या बोटाला धरून एक 5-6 वर्षाची फ्रॉक घातलेली मुलगी खेळत होती. बेळगाववरून परतताना नरसोबाची वाडी करून संजय दादांनी आम्हाला कोल्हापुरात सोडलं होत. रिजर्वेशन केलेल्या बसला यायला अजून 3-4 तास होते. तेवढ्या वेळात महालक्ष्मी मंदिर, त्याच्या बाजूचा शाहू महाराजांचा राजवाडा आणि नंतर जेवण असा प्लॅन आम्ही केला होता. मंदिरात लाईन पाहून मी आणि दादाने मुखदर्शन घेण्याचं ठरवलं. राजेश भाई लाईन मध्ये उभे होते आणि आम्ही त्यांची वाट पाहत मंदिराच्या आवारात गप्पा मारत उभे असताना या तरुणाने आम्हाला गाठलं होत. "नो, वि आर नॉट. वी आर फ्रॉम न्यू बॉम्बे", मी त्याच्याकडे पाहून उत्तर दिल. "व्हीच लँग्वेज डु यु प्रेफर....आय मिन हिंदी, मराठी, इंग्ल...