- सुबोध अनंत मेस्त्री ========================================= नमस्कार. ही घटना मी नुकत्याच केलेल्या एका कोर्सदारम्यानची आहे. मुलांवर कोणत्याही गोष्टीची जबरदस्ती करताना त्यांच्या मनावर आपण काय परिणाम करतोय याची काळजी पालकांनी घ्यायला हवी. वरवर शांत दिसणारी मुलं मनात विचारांचं वादळ घेऊन फिरत असतात याच जिवंत उदाहरण देणार हे आर्टिकल. ========================================= मी नुकताच एक लाईफ ट्रान्सफॉर्र्मेशन चा कोर्स केला. पहिल्याच दिवशी तुम्ही हा कोर्स का लावला याबद्दल ट्रेनर तिथल्या पार्टीसिपेंटना माहिती विचारत होता. हॉलच्या डाव्या आणि उजव्या बाजूला दोन स्टँडिंग माईक लोकांना बोलण्यासाठी ठेवण्यात आले होते. बरेच लोक माईकवर येऊन स्वतःबद्दलचे प्रॉब्लेम्स शेअर करत होते. काही लोकांना तिकडे जबरदस्ती कुणी ना कुणी पाठवलंय हे सुद्धा त्यांनी सगळ्यांसमोर कबूल केलं. त्यात एक 16-17 वर्षाचा मुलगा माईकवर बोलण्यासाठी रांगेत उभा राहिला होता. चष्मा लावलेला, सावळा वर्ण, स्पाईक कट...थोडा स्टाइलीश पण तितकाच चेहऱ्यावरून स्कॉलर स...