नेटयुग - सुबोध अनंत मेस्त्री सध्या नेटयुग जोरदार सुरु आहे. स्मार्टफोनमुळे संपूर्ण जग आपल्या हाताच्या बोटावर आलं आहे. “काय तू व्हाट्सअप/ फेसबुकवर नाहीस? कुठल्या जगात वावरतो राव!.” म्हणजे व्हाट्सअप किंवा फेसबुकवर नसणं म्हणजे जगाच्या कितीतरी मागे असल्याचा एक समज निर्माण झालाय. एखादा इव्हेंट किंवा पिकनिकच सोडाच पण आता लोक कोणत्या हॉटेल मध्ये जेवतायत, कोणतं गाणं ऐकतायत कोणता पिक्चर बघतायत हे सुद्धा पोस्ट करतात. या आभासी जगात व्यक्ती विशेषतः मुलं हरवत चालली आहेत. आता इंटरनेटसुद्धा दिवसेंदिवस स्वस्त होत जाईल. बऱ्याच ठिकाणी डिजिटल इंडियाच्या उपक्रमाखाली वायफाय कनेक्शन लावले जातील आणि या आभासी जगाच्या कक्षा आणखी रूंदावतील. सकाळी झोपतुन उठल्या उठल्या लगेच आपण पहिले व्हाट्सअप चे मेसेजेस चेक करतो आणि मग आपल्या पुढच्या कामाला सुरुवात होते. त्यानंतरही काम करत असताना काही मिनिटांनी आपलं लक्ष या मोबाईल कडे जातंच आणि आपण आपल्या कामापासून वेगळे होतो. सोशल मीडियाचा व्यवस्थित वापर झाला तर त्यासारखं प्रभावी माध्यम कोणतंच नाही. पण याचा गैरवापर होत असेल तर त्यासारखं घातकही काही ...