*गिफ्ट* - सुबोध अनंत मेस्त्री ====================================== माझा मुलगा सार्थक साडे पाच वर्षांचा आहे. या वयात मुलांना चॉकलेट्स, कॅडबरी, आईस्क्रीम अशा गोष्टी आवडतात. सध्या किंडर जॉयची क्रेझ मुलांना आहे. त्यातलं चॉकलेट खाण्यापेक्षा खेळणी कोणती मिळतात यात त्यांना इंटरेस्ट जास्त असतो. सार्थक सुद्धा किंडर जॉय पहिल्यांदा दोन वर्षांपूर्वी खाल्ल्यापासून दुसऱ्या चॉकलेट बद्दल बोलतच नाही. आता एखाद्या चॉकलेटच्या तुलनेत ही किंमत कमीत कमी दुप्पट आहे. त्याला पैशाची किंमत आतापासून कळावी म्हणून काहीतरी करावं अशी ईच्छा होती. तेवढ्यात माझा फायनॅनशीअल ऍडवायजर मित्र महेश चव्हाण याची पोस्ट मी फेसबुकवर पाहिली. त्याचा मुलगा स्पर्श सार्थकपेक्षा एक दोन वर्षे लहान आहे. स्पर्शने त्याच्या गल्ल्यातल्या सेविंग मधून स्वतःसाठी सायकल घेतली अशी ती पोस्ट होती. मला कल्पना सुचली. सार्थकची जुनी वॉटरबॅग आम्ही गल्ला म्हणून वापरायला लागलो. काम केल्याशिवाय पैसे मिळणार नाहीत हे समीकरण. मग ते अंथरून घालणं असू दे किंवा कचरा काढणं असू दे. ...