बरेच दिवस या कादंबरीबद्दल ऐकून होतो. कुरू कुळातील राजा ययाती. त्याचे बाबा नहुष यांनी इंद्रावर विजय मिळवून ऋषींनाच पालखीचे भोई बनवले आणि विजयाच्या उन्मादात त्यांना लाथाडले. “नहुषाची मुलं कधीच सुखी होणार नाहीत” या एका ऋषींच्या शापाने ययाती आणि त्याचा भाऊ यति याचं आयुष्य पालटून गेलं. तस पाहिलं तर पुराणातली जादू-आश्चर्याने भरलेली एक कथा पण त्यातली पात्र आजही आपल्या आजूबाजूला दिसतात. विजयच्या उन्मादात गर्विष्ठ झालेला नहुष राजा, वासनांध आणि फक्त भौतिक सुखात समाधान शोधणारा ययाती, सूडाच्या भावनेने आयुष्य जगणारी देवयानी, कोपिष्ट शुक्राचार्य, आयुष्यच तत्वज्ञान कळलेला आणि वेळोवेळी कठीण प्रसंगात उभा राहणारा कच, पितृआज्ञेपोटी दासित्व स्वीकारणारी आणि दुसऱ्यांच्या विचाराने प्रेमाचा त्याग करणारी श्रमिष्ठा. माणसाच्या दुर्गुणांना जोपर्यंत तो जोपासत राहतो तोपर्यंत ते त्याचा छळ करीत राहतात यावर वि. स. खांडेकर म्हणतात, “वासना ही अशी गोष्ट आहे जिचा आपण जितका उपभोग घेऊ तितकी ती फोफावत राहते.” आपण स्वतः आजही आचरणात आणू शकतो अशा कितीतरी गोष्टी ययाती आपल्याला सहज शिकवून जातो फक्त आपल्याकडे तो दृष...